मित्र अन दैव – संदीप बोबडे

*।। बोबडे बोल ।।*©

 

*।। मित्र अन दैव ।।*

 

कुठे हारतो माणूस,

तो, आपल्याच घरांत

सर्व महाराजांनाही,

भोग भाग्य हेची होते..

 

खुप काही ठरविले

कार्य आगळे मनांत

पण दैवाला मंजूर,

सारे वेगळेच होते..

 

एका क्षणात सर्व

होत्या चे नव्हते होते….

आयुष्य वेचतांना,

कोण ते जाणुन होते?

 

गेलो जाणावयास

चित्र ते भयाण होते…

पाय ओढणारे सारे,

माझे आपलेच होते…

 

*।। बोबडे बोल ।।*©

*एक अक्षरगण – अष्ठाक्षर*

*@संदीप बोबडे*

*८६०००४४२५४*