एकत्र व्हा रे – संदीप बोबडे

।। बोबडे बोल ।।©

।।एकत्र व्हा रे।।

कुणीच नव्हता वाली
लढत मी जेंव्हा होतो….
पहात दुरुन होते
घडत मी जेव्हा होतो

विचारलेल्या प्रश्नांना
साद मिळत नव्हती
एकटेच वाटे मला
सखे अवती भवती
मनातले सल माझ्या
वेचत एकला होतो
कुणीच नव्हता वाली
लढत मी जेंव्हा होतो….

आज गराडा बघतो
हर्ष तसा होत नाही
विखुरलेले सोबती
आजही एकत्र नाही
कित्येक गुऱ्हाळ गोष्टी
समजावूनी सांगतो
हासोनी दर्शवती ते
ऐकुनी गण -पांगतो
कुणीच नव्हता वाली
जेंव्हा मी लढ़त होतो
पहात दुरुन होते
घडत मी जेव्हा होतो
पहात दुरुन होते
लढत मी जेंव्हा होतो….

।। बोबडे बोल ।।©

एक अक्षरगण – अष्ठाक्षर

@संदीप बोबडे

८६०००४४२५४