योग दिवसाचे औचित्य

योग दिवसाचे औचित्य
अन कोल्ह्यांच्या खांद्यावर गदा
वाह शेठजी काय नेम लावलात
आम्ही तर तुमच्यावर नेहमीच फिदा….।।

सहकारांचे सावकार
कसे राजकारण खेळतील??
आता केंद्राचे सरकार,
सर्व नागरिकांना सांभाळतील…।।

नको कुणाचे पोस्टर
नको कुणाचे जहरी विचार….
सर्वांचे होईल टिकाकरण;
सुव्यवस्थे सकट भला प्रचार…।।

राज्याने खेळायचे
केंद्राला सतत बोलायचे
बाहेर कुणाच्या ईशाऱ्यावर,
इथं आत कुणी डोलायचे…
वेड लावते – तुमची हीच अदा..
आम्ही तर तुमच्यावर नेहमीच फिदा….।।

।।बोबडे बोल।।