॥ हरवीलेली राखी……॥

॥ बोबडे बोल ॥

 

॥ हरवीलेली राखी……॥

 

सहज आठवत होतो ते दिवस
कित्ती आपुलकीने,
राखी साजरी व्हायची
एकमेका घरी वर्दळ अन
मांदीयाळी व्हायची
स्पंजच्या राख्यांन्नी
हाथ भरून जायचा
ताई पेक्षा लहान भाऊ
भाव खाऊन जायचा..
 
सायकलीचा क्षिण नाही
किंवा रागलोभ नाही
प्रत्येकाकडे हजेरी देणे
यांस महत्व होते
भेटवस्तु नगण्य ठरत असे
अन चेहर्यावर,
आनंद ओसंडत असे
“ते” दिवस आठवून
आज ही उर भारावुन जातो
डोळ्यात आसवांचा आरसा उभा राहतो
 
विज्ञानयुगात आपण,
“ते” सारे हरवून बसलो
माझा पैसा तुझा पैसा
अन नाटकी हसु लागलो
चेहर्यावर उसने भांव,
एकमेकांना टाळू लागलो
समारंभात भेटलोच तर
अवचित स्टेटस सांभाळू लागलो..
अडल्या नडल्या वेळी,
फुकाचा घाम गाळू लागलो
कोणजाणे कां – आपण असे वागु लागलो.
कोणजाणे कां – आपण असे वागु लागलो
 
त्या स्पंजच्या मायाळू चमचम राख्या,
नातेगोते गीळून गेल्या
अन रेशीम धाग्यात छोट्या,
उरले संबंध पिळुन गेल्या
आता माझ्या तुझ्याचाच
गाळ उरला आहे
आस तिच दाटते कधीकधी,
पण भकास वेळ लोटते आहे
अघटीतच सारे घटते आहे
अघटीतच सारे घटते आहे
अघटीतच सारे घटते आहे
 
प्रत्येकाचाच प्रपंच होता
पण – कुणीतरी एक धागा होता,
त्या धाग्यास एक मान होता
तो सार्यांन्ना समान होता
कुटुंब त्या मुळेच एकत्र बांधल जायच
ऊणा खुणा सार्यांच्या
त्या समोरच मांडल जायचं
आता शिकून सावरून आपण
खुप खुप मोठे झालो
मम म्हणायचे सोडून
माझे म्हणू लागलो
सुशिक्षित भारतीय म्हणोन
भावनांचे देखिल
आरक्षण मांडू लागलो
जुनी संस्कृती सांडू लागलो
कोणजाणे कां – आपण असे वागु लागलो
भावनांचे देखिलsss
आरक्षण मांडू लागलो
जुनी संस्कृती सांडू लागलो
कोणजाणे कां – आपण असे वागु लागलो
कोणजाणे कां – आपण असे वागु लागलो

 

॥ बोबडे बोल ॥©

 

संदीप बोबडे