॥ बोबडे बोल ॥
॥जाणते पणी टाळणे ॥
मी पण होते रे सोहळ्यात
तु कां रे मज नाकारले
माझीया सावलीस ही
जाणून आज टाळले……
एकट्याने जगण्याचा
अनोखा छंद मज लागला
स्पर्धेसाठी स्पंदनांना
तु कसा ना विसरू लागला
सवय झाली रे आताशा
असे टाळणे बघायला
रूप तुझे – रोज नवे
रौद्रातले सोसायला
आताशा प्रेम तुझे
भेसुर मज का भासू लागले…??
तु कां रे मज आज नाकारले
माझीया सावलीस ही
जाणून आज टाळले……
एक घास ठरवून आपण
जो दोघांत नेहमी वेचला
त्या सोनेरी दिवसांच्या
आणाभाका अश्या का विखुरल्या
चेतना मन्मनी आपुल्या
आसवांतच विझावल्या…
तु कसा ना विसरू लागला
तु कां रे असां दुरावलां?
सांग ना असे अचानक
काही बाही कां मी वागले
नको ना जीवघेणी सवय अशी
उच्छ्वासी मज तू गाळले
तु कां रे मज आज नाकारले
माझीया सावलीस ही
जाणून आज टाळले…..
मज आज नाकारले
जाणून आज टाळले…..
*॥ बोबडे बोल ॥*©