॥ बोबडे बोल ॥©
स्वराज्य – सूराज्य
भिन्न भाषा भिन्न प्रांत…
पृथ्वीवर सुमंगला
एकसंघ माझा देश
टिळकां मुळे घडला
विखूरल्या भारताला
एकत्र त्यांनी बांधला©संदीप बोबडे
पृथ्वीवर सुमंगला
एकसंघ माझा देश
टिळकां मुळे घडला
विखूरल्या भारताला
एकत्र त्यांनी बांधला
हळूहळू भारतीय
भारतीयास भेटला….
भेदभाव तोडफोड
होती इंग्रजांची खेळी….
लोकमान्य टिळकांनी
ओळखली योग्य वेळी
प्रण एकत्र होण्याचा
तो – टिळकांनी घेतला
हळूहळू भारतीय
भारतीयास भेटला….
यावा एकत्र समाज
मनी होता हाच भाव
श्री गणेशाच्या कृपेने,
पडू लागला प्रभाव…
एक झाली जन शक्ती
गज गणांत जिंकला
एकास दोन भेटले
जनसागर लोटला
हळूहळू भारतीय
भारतीयास भेटला….
वसा तो लोकमान्यांचा
जना गणांत पोचला….
जन जागृती कराया
बहू जिवांनी वेचला….
आज काही नेता लोक
करतात जात पात…..
शिकुन चार पुस्तके;
काही बाही ते डोक्यात….
चला एक होवू पुन्हा…..
मानवता जपू चला
भेदभाव संपवून
देश घडवू आपला
एक झाली जन शक्ती
गज गणांत जिंकला
एकसंघ माझा देश
टिळकां मुळे घडला
विखूरल्या भारताला
एकत्र त्यांनी बांधला
हळूहळू भारतीय
भारतीयास भेटला….
॥ बोबडे बोल ॥©