॥ बोबडे बोल ॥©
स्मृती गंध
गोऱ्या गालांवर का ग रुसवा…
गुलाबाच्या ओठांमागे राग फसवा
ग गडे राग फसवाssss
गोऱ्या गालांवर का ग रुसवा…
किती रूसशिल – कधी हसशील
सांग ना जरा….
अल्लडश्या डोळ्यांतून न्याहाळ ना मला
फुगवू नको गाल तुझे – माझ्या लाडक्या फुलाssss
फुकाचा हा राग तुला…. शोभे ना बरा
किती रूसशिल – कधी हसशील
सांग ना जरा….
ह्या रागा परी वनांतही दाटलाय पाचोळा
पानं पिवळी पतझड अन खुललाय तांबडा
सुकलेल्या गालांवर…..पळस फुलला….
आता तरी हास जरा सोड तो नखरा
फुकाचा हा राग तुला…. शोभे ना बरा
किती रूसशिल – कधी हसशील
सांग ना जरा….
गोऱ्या गालांवर का ग रुसवा…
गुलाबाच्या ओठांमागे राग फसवा
©संदीप बोबडे
एक मुक्त काव्य