सावरलेली जख़म – संदीप बोबडे

॥ बोबडे बोल ॥©

सावरलेली जख़म

किती घातलेत तू घाव
समजून की मी बिघडलो…….
गुरफटुन घेतलेस असे काही
अन, मी आज असा – घडलो
तु परिस अन मी लोह
सावलीत तुझ्या – वावरलो……
काय होतो काय झालो
अन, मी आज असा – घडलो..
तुझ्या टाकीच्या घावांन्नी आज मी सावरलो
काय होतो काय झालो
अन, मी आज असा – घडलो ।। ।।

घडवलेस तू
उठवलेस …….तू
जिद्दिस माझ्या – पेटविलेस तू
ओल्या जखमांन्ना माझ्या
हळूवार फुंकलेस …..तू
पदो पदी घडली सप्तपदी
या जन्मी मज सावरलेस तू……..
गुरफटुन घेतलेस असे काही
अन, मी आज असा – घडलो
काय होतो काय झालो
अन, मी आज असा – घडलो
उपकारांत तुझ्या, सदा
आकंठ – आता मी पुरता बुडलो
काय होतो काय झालो
अन, मी आज असा – घडलो ।। ।।

॥ बोबडे बोल ॥©

एक गज़ल

©संदीप बोबडे