साद लाटांची- संदीप बोबडे

।। बोबडे बोल ।।

साद लाटांची

कित्ती आठवणी तुझ्या
लाटेवर स्वार झाल्या
एका पाठोपाठ एक
पुन्हा पुन्हा ताज्या झाल्या ।।

प्रत्येक लाटेवर – त्या
मज तु दिसू लागली
हेलकावे घेता घेता
ओढ “ती” वाढू लागली
खळी गोssड गालांवर
सुस्पष्ट दिसू लागली…
आणि जवळ येतांना
हास्य फेसाळू लागली
मिठीत घेतो म्हणतां
रेतीत विरत गेली००००००
रेतीत विरत गेली००००००
डोळ्यांत अश्रूंनी माझ्या
वाटा पुन्हा केल्या ओल्या
कित्ती आठवणी तुझ्या
लाटेवर स्वार झाल्या
एका पाठोपाठ एक
पुन्हा पुन्हा ताज्या झाल्या ।।

हिम्मत न हारता मी
सागरास पुढे गेलो
अथांग खोलीस त्याच्या
तुझ्याच साठी भिडलो
पाठी गेला तोही भला
मला हळू झुलवत
घेवून गेला तुला – तो
जबरीने वहावत
अचानक पायाखाली
वाळू सरकू लागली
वाचवण्या मला आता
तू कशी धावून आली
मिठीत बांधून मला
ठेवले जसे शिंपल्याssssss
वाटा पुन्हा ओल्या झाल्या
स्मृती पुन्हा ताज्या झाल्या
कित्ती आठवणी तुझ्या
लाटेवर स्वार झाल्या
एका पाठोपाठ एक
पुन्हा पुन्हा ताज्या झाल्या
वाटा पुन्हा ओल्या झाल्या
स्मृती पुन्हा ताज्या झाल्या
स्मृती पुन्हा ताज्या झाल्या

।। बोबडे बोल ।।©

एक अष्टाक्षर

@संदीप बोबडे