॥ बोबडे बोल ॥©
संक्रांत
मनातील इच्छा
जेव्हा आकाशी भरारी घेते
सोसाट्याचं वारं सुद्धा
नकळत साथ देते
तिळा तिळा ने वाढते दाहकता
अन – गुलाबी थंडी होते शांत
सुवासिन्या कश्या नटती – थटती
आली – ही बघा संक्रांत || ||
तिळा तिळाचे वाण
सर्व लोकांत वाटले
आपआपसातले प्रेम
सर्व मनात दाटले
दूर व्हावे रोश सारे
आनंदाने भरावा आसमंत
सुवासिन्या कश्या नटती – थटती
आली – ही बघा संक्रांत
हुडहुडत्या धरतीला आता
उबी – किरणांची साथ…
अचुक अविरत हे पर्वण चाले
देती निसर्गाला हाथ..
दिनकराचे रोज अश्व धावती
तांबड्या लाली किरणांत
मुक्त पवन ही स्फुरण पसरवितो
होइ आनंदी सुप्रभात….
सुवासिन्या कश्या नटती – थटती
आली – ही बघा संक्रांत
आली – ही बघा संक्रांत
आली – ही बघा संक्रांत || ||
॥ बोबडे बोल ॥©
@ संदीप बोबडे