॥ बोबडे बोल ॥ ©
शिमग्याची धुळवड*
रानी फुलले पळस
अंगणी आंबे मोहर
रण धुळ – वासे गावी
हा शिमग्याचा कहर
अंगणी आंबे मोहर
रण धुळ – वासे गावी
हा शिमग्याचा कहर
पतझड रानीवनी
नी पालवी चा बहर
फाल्गुन पुनव आली
धुळवडीची लहर
हा शिमग्याचा कहर
आळस नैराश्य द्वेश
होलिके सवे जाळले
गाठी नारळी धुरात
गगनी उंच ऊडाले
गाव वेशी गोळा झाले
तिन्हीसांजेचा प्रहर
फाल्गुन पुनव आली
हा शिमग्याचा कहर
एकजुट समाजात
हसर्या रंगात न्हाली
प्रेम नी सद् भावना
वाहे हर एक गाली
कुणी नसे राजा रंक
ना – शत्रुत्व – क्षणभर
फाल्गुन पुनव आली
हा शिमग्याचा कहर
ओसरली थंडी – आता
दाह वाढे कणभर
रंग बिरंगी आनंदी
धुळवड गावभर
तुप वाटी पुरणाचे
भोजन हे पोटभर
पतझड रानीवनी
नी पालवी चा बहर
फाल्गुन पुनव आली
धुळवडीची लहर
हा शिमग्याचा कहर
धुळवडीची लहर
हा शिमग्याचा कहर
धुळवडीची लहर
हा शिमग्याचा कहर