शाळा कालची – आजची

॥ बोबडे बोल ॥©

शाळा कालची – आजची

माझी नागपूरी शाळा
ओला खडू सुखा फळा..

काळीशी दगडी पाटी
पिशवीत ताट वाटी….
पाइ तुडवत वाट
अजबच होता थाट…
असे शाळेला जायचे
बोरे – चुरण खायचे…

आज कुणा ठाव नाय..
टाय – शूज – वायफाय…
वातानुकूलित वर्ग…
काचे बाहेर – निसर्ग
प्यायचे पाणी – फिल्टर..
तब्येत अशी- निस्तर
चढाओढी कोरे ज्ञान
चढ्या नंबरीचा मान…
ना – कलागुण संस्कार
शिकवण्यांचाच भार…

विद्या अशी करी गोळा
कुठे गेला खडू फळा
गुरूजींची छडी डोळा
मारूनी लाविती लळा

माझी नागपूरी शाळा
ओला खडू सुखा फळा
माझी नागपूरी शाळा
ओला खडू सुखा फळा

॥ बोबडे बोल ॥©

एक अष्टाक्षर

©संदीप बोबडे