बंद – पुरोगामी लोकशाही चा

॥ बोबडे बोल ॥ ©

बंद – पुरोगामी लोकशाही चा

कोवळ्या मनावर तुझ्या
मी कोरतोय “जात”
रिकामटेकडे राजकारण
अन – तु सोसशिल जाच……

ते बैसले ऐटीत..
ना खळगे ना कुठली खाच…
त्यांना आपसुक निवृत्ती वेतन
अन – तु सोसशिल जाच……

ऊठ मर्दा – मावळा तू
उगा नादी लागू नको…..
यांचे राजकारणी घराणे
प्यादे त्यांचे तू बनू नको

पै पैसा यांची भूक
अन तहान यांची लाच
पिढ्या यांच्या तरतील….
अन – तु सोसशिल जाच……

॥ बोबडे बोल ॥ ©
एक मुक्त काव्य
©संदीप बोबडे